आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्य कर्मचाऱ्यांची बडतर्फी, फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- स्वातंत्र्यलढ्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसताना तसे खोटे पुरावे सादर करून महाभागांनी अापल्या पाल्यांना शासकीय सेवेत रुजू केले हाेते. या प्रकरणात बीड जिल्ह्यातील बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या १०६ पाल्य कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट २००५ मध्ये ३५५ प्रकरणांसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचे आदेश दिले होते.
 
२९८ स्वातंत्र्यसैनिकांचे पेन्शन, सवलती बंद करण्यास सांगितले होते. बीडसह राज्यभरात शासकीय सेवेतील बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना बडतर्फ करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शासकीय लाभ नाही 
कारवाईबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले अाहे. २९८ पैकी काही जण सुप्रीम कोर्टात गेले अाहेत. उर्वरित १०६ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. त्यांना कोणतेही शासकीय लाभ मिळणार नाहीत. 
-एम. डी. सिंह, जिल्हाधिकारी, बीड 
बातम्या आणखी आहेत...