आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणा-या रोज 10 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे उद्दिष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी पर्यावरण समितीच्या झालेल्या बैठकीत दिले होते. 6 जुलैपासून शहरात कारवाई करत 222 जणांना नोटीस देण्यात आली. 49 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नियम झुगारणा-या रोज किमान 10 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिका-यांनी दिले.

शहर स्वच्छतेवर पालिकेच्या लक्ष केंद्रीत केले असून स्वच्छतेत अडचण ठरणा-यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टीक, कत्तल खान्यांमुळे होणारी अडचण, पाणी पाऊच रस्त्यांवर टाकणे आदींची तपासणी केली जात आहे. दोषी ठरलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ज्यांच्या दुकानासमोरील नाल्या चोक अप झाल्या आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नायक, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, क.का. मुखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यासाठी उपद्रव पथक प्रमुख शामसन कसबे, भिमा लोंढे, गौतम हिवाळे, फकीरा आव्हाड, चंदकांत ससाने काम पाहत आहे. जुना जालना भागातील बाजार चौकी, लक्कड कोट, नव्या जालना भागातील फुल बाजार, टांगास्टॅन्ड, शिवाजी पुतळा रोड, अमरछाया रोड, महात्मा फुले मार्केट, गांधी चमन आदी भागात पाहणी केली.

शहरातील काही ठिकाणी मेला थेट नाल्यांमध्ये सोडण्यात आलेल्या असल्याचा प्रकार असल्याने सर्व ठिकाणी या मोहिमेत तपासणी केली जाणार आहे. ज्यांनी सेप्टी टँक तयार केले नाहीत त्यांची तपासणी केली जाणार आहे. ही मोहिम पुढील दोन दिवसांमध्ये होणार आहे. यांची संख्या जवळपास 500 च्या जवळपास आहे.

नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 चे कलम 322 नुसार घनकचरा व साफसफाई नियोजन उपविधीनुसार सार्वजनीक उपद्रव आहे. यामुळे याचे उल्लंघन झाल्यास यानुसार 229 तसेच मुंबई पोलिस अधिनियमातील तरतूदीनुसार कलम 115,116 आणि 117 नुसार कारवाई करून दंड वसूल करण्याचे आदेश आहेत.

12 तासात सुधारण्यासाठी नोटीस
नुतन वसाहत या ठिकाणी मांस विक्री करणा-यांकडे मास विक्रीचा परवाणा नसल्याचे आढळून आले आहे. त्यांना नोटीस देवून 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. सोमवारी या भागात पथकाची तपासणी होणार आहे. नोटीसनूसार सुधारणा केली नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे. ज्यांच्याकडे मास विक्रीचा परवाणा असेल त्यांनाच या ठिकाणी थांबता येईल.