आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसह काँग्रेसचे दोन सदस्य फुटले, आदित्य पाटील केजचे नगराध्यक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली.  काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन नगरसेवक फुटल्याने नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर केज नगरपंचायतीच्या  नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या बंडखोर नगरसेविका सायरा इनामदार यांची वर्णी लागली आहे.    


भाजपचे हारुण इनामदार आणि काँग्रेसचे आदित्य पाटील यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत झाली. शुक्रवारी यासाठी निवड प्रक्रिया झाली. दरम्यान, दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार अल्पमतात असल्याने या निवडीत  राष्ट्रवादी किंगमेकर ठरण्याची चिन्हे होती.   परंतु नाट्यमय घडामोडींत भाजपचे नेते रमेश आडसकर यांच्या  दोन सदस्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसोबत ‘हात’ मिळवला, तर काँग्रेसच्या दोन सदस्यांनी नगराध्यक्षपदासाठी भाजपला, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीला मदतीचा ‘टायमिंग’ साधला. 

बातम्या आणखी आहेत...