आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंड वाजवून नव्हे, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा : ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - विविध घोटाळे आणि भ्रष्टाचारामुळे मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळला आहे. लोकांच्या अडचणी कुणीही ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे तोंड वाजवून नव्हे, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, असा आदेश युवा सैनिकांना देतानाच येणारे सरकार शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे असल्याने मतदारांचे दु:ख आमचा मुख्यमंत्री त्यांच्या घरी जाऊन जाणून घेईन, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. येथील गांधी चौकात आज युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी दुपारी 2.54 वाजता भाषणाला सुरुवात केली आणि अवघ्या 17 मिनिटांतच भाषण संपवले.

आपल्या छोटेखानी भाषणामध्ये ठाकरे यांनी सांगितले की, केवळ महाराष्ट्रच नाही तर शिवसेना संपूर्ण देश भगवा करणार आहे. हे काम करीत असताना मध्ये आलेल्यांना तोडल्याशिवाय राहणार नाही, असे सांगतानाच हातातील शिवबंधन दाखवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख भ्रष्ट काँग्रेस असा केला.