आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Administration Aquire The Ballot Box Foud In Jalna

‘त्या’ मतपेट्या जालना तहसीलच्या ताब्यात, सोमवारी रेकॉर्ड रूमची करणार तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - झेडपी क्वार्टरच्या पाठीमागे मोतीतलाव क्षेत्रात सापडलेल्या मतपेट्या रविवारी जालना तहसील कार्यालयाने ताब्यात घेतल्या. सोमवारी जुन्या तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूमची झडती घेतल्यानंतरच या मतपेट्यांचे धागेदोरे हाती येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोतीबागेजवळच असलेल्या जुन्या विहिरीत शनिवारी १० मतपेट्या आढळल्या होत्या. जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांचाच वापर झाल्याने या मतपेट्या किमान १० वर्षे जुन्या असाव्यात, असा तर्क लावला जातो आहे. दरम्यान, निवडणूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मतपेट्यांचा वर्ष २००३ पूर्वीच्या निवडणुकीत मतदानासाठी वापर केला जात असे. आता फक्त पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीच या मतपेट्यांचा वापर होतो. शिवाय वापरानंतर या मतपेट्या संबंधित तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये ठेवतात. शनिवारी आढळलेल्या पेट्या या नेमक्या कोणत्या तहसील कार्यालयाच्या आहेत, हे सोमवारी समजू शकेल. १० मतपेट्यांबरोबरच एका दुचाकीचा सांगाडाही मिळून आला होता. या दुचाकीची माहितीही पोलिस घेत आहेत.
नोंदींच्या तपासणीनंतरच मतपेट्यांचा उलगडा
सध्या मतपेट्या ताब्यात घेतल्या असून सोमवारी जुन्या तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम उघडून बघू. नांेदींच्या तपासणीनंतरच सापडलेल्या मतपेट्यांची माहिती पुढे येईल, असे जालन्याचे तहसीलदार रेवनाथ लबडे म्हणाले.