आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युद्धे होत नाहीत, घुसखोर पाठवून दहशत निर्माण केली जाते : अॅड. उज्ज्वल निकम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - सध्याच्या काळात बॉम्बफेक करणारी युद्धे होत नाहीत. घुसखोर पाठवून छुपे हल्ले केले जातात. दहशत निर्माण केली जाते, अशी टीका गुरुवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कंधार येथे केली.

कंधार येथील शिवाजी महाविद्यालयात पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, अॅड. मुक्तेश्वर धोंडगे उपस्थित होते. अॅड. निकम म्हणाले, अजमल कसाबने दहशतवादी हल्ला केला नाही, तर देशाशी युद्धच खेळले. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आर्थिक बलस्थानावर हल्ले केले. रेल्वेस्थानकावर निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध युद्ध खेळण्याचाही गुन्हा लावण्यात आला, असेही ते म्हणाले. सध्याच्या काळात पोलिस पाटील शोभेचे पद झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. हिमायत बेगच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर कसे झाले यावर आता काही सांगता येणार नाही. कारण अजून निकालपत्र वाचलेले नाही. वाचल्यानंतरच त्याबाबत नेमकेपणाने बोलता येईल. असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...