आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 26 Years Candidate From Marathwada Been Speaker

तब्बल २६ वर्षांनंतर मराठवाड्याला अध्यक्षपद, चाकूरकरांनंतर हरिभाऊनानांच्या रूपाने बहुमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राज्याच्या सभागृहाचे मुख्याध्यापक अशी ओळख असलेले व सभागृहाच्या पावित्र्याची पायमल्ली करणा-यांना त्यांची जागा दाखवण्याचा अधिकार असलेले राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षपद मराठवाड्याला लाभले आहे. तब्बल २६ वर्षांनंतर हे भाग्य हरिभाऊ बागडे यांच्या रूपात मराठवाड्याच्या वाट्याला आले आहे.

सध्याचे पंजाबचे राज्यपाल व केंद्रशासित प्रदेश चंदिगडचे प्रशासक शिवराज पाटील चाकूरकर यांची पाचव्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्या वेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. कायद्याचे पदवीधर, मुळातच शिस्त अन् कर्तव्याप्रतिचे भान व त्याला लाभलेली अनुभवाची भक्कम साथ यामुळे पाटील यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे मराठवाड्यातील राजकीय गुणवत्ता अन् प्रगल्भतेची ओळख राज्याला झाली. पुढे हाच अनुभव पाटील यांना लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन जाणारा ठरला. अनुभव, अभ्यास यामुळे ते आज पंजाबचे राज्यपाल व चंदिगडचे प्रशासक म्हणून भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे ते काँग्रेसनियुक्त राज्यपाल असले तरी एनडीए सरकारनेही राज्यपाल म्हणून त्यांचा हा मान कायम ठेवला आहे. दरम्यान, औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगावचे सुपुत्र हरिभाऊ बागडे यांना हा मान मिळाला आहे.