आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Aswering The Show Cause Notice To Election Commission Speak Munde

निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिल्यानंतरच बोलणार - गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिल्यानंतर म्हणजे शनिवारनंतरच यावर जाहीरपणे बोलणार आहे, असे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.


निवडणूक खर्चाविषयी मी जे काही बोललो त्यात काही लोकांना काय बेताल वाटले, ते मला समजले नाही. पण ते जे काही बोलले त्याबद्दल मी त्यांना माफ केले आहे, अशा शब्दांत मुंडे यांनी अमरसिंह पंडित यांचा नाव न घेता समाचार घेतला. कार्यकर्त्यांनी संयम राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. एका खासगी कार्यक्रमासाठी मुंडे शहरात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यास उत्तर देणार आहे. एवढेच नाही तर माझ्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणा-या सर्वांना मी जशास तसे उत्तर देणार असल्याचेही ते म्हणाले.