आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Long Hours Old Man Sucessfully Removed From Borewell

12 तासांची झुंज यशस्वी; बोअरमधील वृद्ध सुखरूप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी (बीड) - बंद बोअरमध्ये पडलेल्या 80 वर्षीय वृद्धाला 12 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात बीड प्रशासनाला यश आले. माणिकराव वायगुडे (80) असे त्या वृद्धाचे नाव आहे.


कुप्पा शिवारातील राजेभाऊ काळे यांच्या शेतातील बंद पडलेल्या बोअरमध्ये बुधवारी दुपारी माणिकराव पडले होते. घटनेच्या काही वेळानंतरच संपूर्ण यंत्रणा त्यांना बाहेर काढण्यासाठी लागली होती. 25 फुटांवर अडकलेल्या माणिकरावांना कोणती इजा होऊ नये याची काळजी घेण्याचे आव्हान होते. बोअरच्या बाजूला 30 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. मध्यरात्री अडीच वाजता माणिकरावांना बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.


हरियाणातील ‘प्रिन्स’ची आठवण यानिमित्ताने झाली. मृत्यूवरही ‘प्रिन्स’ने विजय मिळवला होता. अगदी त्याच प्रकारे माणिकरावही बोअरबाहेर सुखरूप निघाले.