आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये लक्ष्मन मानेंच्या तोंडाला काळे फासले, कारण अस्पष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - 'उपरा'कार लक्ष्मन माने यांचा बीडमध्ये निषेध करण्यात आला असून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. काळे फासणारे कोण होते याची माहिती मिळालेली नाही. मात्र, ते माझेच कार्यकर्ते आहेत, असे सांगत माने यांनी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे.

माने आज बीड दौ-यावर होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी लक्ष्मन माने मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या तोंडाला काळे फासले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मन माने हे वसंतराव नाईक महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील कर्ज प्रकरणे मंजूर केली नाही. त्याचा राग व्यक्त करत काही कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, काही महिन्यांपूर्वी माने यांच्यावर त्यांच्याच संस्थेच्या महिला कर्मचा-यांनी लैंगिक शोषण आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याचा निषेध म्हणून माने यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. पीडित महिलांच्या तक्रारीनंतर माने फरार झाले होते. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी त्यांना समोर येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी ते पोलिसांना शरण आले होते. या प्रकरणात जामीनावर त्यांची सुटका झाली होती.