आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्री महादेव जानकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादेत राष्ट्रपादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन. - Divya Marathi
औरंगाबादेत राष्ट्रपादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन.
परळी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा राज्याचे कॅबिनेटमंत्री महादेव जानकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान, परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर परळी शहर पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, जालना, लातूर, उस्मानाबाद व परभणीत आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
काय म्हणाले जानकर..
- ज्या चेला चपाट्याने पंकजाताईंच्या विरोधात षडयंत्र केलं त्याचं नाव बारामती आहे.
- बारामतीची वाट लावल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही.
- बारामतीची सुपारी घेऊन जो परळीचा चमचा काम करतोय त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.
- गोपीनाथ मुंडेंना आयुष्यभर ज्या पवारांच्या औलादीने विरोध केला त्याच औलादीच्या पाया पडणारी ही औलाद आहे.
- संत महंताने संताच्या भूमिकेत राहायचे असते, चमचाच्या भूमिकेत राहायचं नसते.
- बारामतीची सुपारी घेऊन बहिणीला अडवायचं काम करताल, तर पठ्ठ्याचं नाव महादेव जानकर आहे.
- तुम्ही नेत्याला मानणार की, चमचा-एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याला मानणार
बातम्या आणखी आहेत...