आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तालयासाठी नांदेडमध्ये आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- विभागीयआयुक्तालयाच्या मागणीसाठी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने निर्णय घेतला, अधिसूचना जारी केली तरीही आयुक्तालयाच्या स्थापनेबाबत शासन चालढकल करीत असल्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी साडेअकराच्या सुमाराला सुरू झालेल्या आंदोलनात प्रा. बालाजी कोंपलवार यांनी प्रास्ताविक केले. शासन या प्रश्नावर वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. अामदार अमर राजूरकर म्हणाले, आयुक्तालयासाठी गुणवत्तेवर योग्य ठिकाण नांदेड आहे. शासनाने दांगट समितीला मुदतवाढ देता आयुक्तालय सुरू करावे. आमदार हेमंत पाटील या वेळी म्हणाले, आयुक्तालयासाठी शिवसेनेने एक लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याकडे पाठवले तरीही शासन चालढकल करीत आहे. याबाबत विधानसभेतही प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले, आयुक्तालयाबाबत शासनाची भूमिका निराशाजनक असून त्यांनी न्यायालयाचा अपमान केला. आता आयुक्तालयाची स्थापना झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. या वेळी मजविपचे सदाशिवराव पाटील, सेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात, पत्रकार शंतनू डोईफोडे, माधवराव पाटील, द. मा. रेड्डी, माजी आमदार डॉ. डी.आर. देशमुख, नागोराव पाटील रोशनगावकर यांचीही भाषणे झाली.

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विभागीय आयुक्तालयाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, आमदार अमर राजूरकर, पत्रकार शंतनू डोईफोडे, द.मा.रेड्डी, डॉ. किरण चिद्रावार, शमीम अब्दुल्ला, प्रा. बालाजी कोंपलवार आदी. छाया:करणसिंह बैस