आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डीच्या नराधमांना भरचौकात फाशी द्या, परभणीत पाचव्या मोर्चातही लाखोंचा महापूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- जिल्ह्याच्या इतिहासात आजवर कधीही झालेला ऐतिहासिक विराट क्रांती मोर्चा काढताना मराठा समाजाने अत्यंत शिस्तीत शांततेत समाजाच्या एकीची वज्रमूठ दाखवून दिली. महिला, पुरुषांसह शाळकरी चिमुकल्यांपासून आबालवृद्धांनी मोर्चात सहभाग नोंदवत कोपर्डीच्या घटनेचा निषेध नोंदवला. मोर्चाच्या जागेचे ठिकाण ते समारोपाचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ठिकाण असाच हेड टू टेल मोर्चा राहिला. औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगाव, बीडनंतर परभणीत काढलेल्या मोर्चानेही सर्वच विक्रम मोडले.

कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात यावा आदी विविध मागण्यांचे फलक घेऊन समाजाच्या सर्वच स्तरांतील बांधव मोर्चात सहभागी झाला होता. भूतो भविष्यति...! असाच मोर्चा म्हणावा लागेल. सकाळी आठ वाजेपासून मोर्चेकरी जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर जमा होत होते. महिलांची व्यवस्था महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आली होती. दुपारी बारा १२ वाजता सुरुवात झाली. सर्वात पुढे महिला मुली निघाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देऊन समाजबांधवांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर एका शाळकरी मुलीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. अत्याचारग्रस्त मुलीला दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. १० बालिकांनी दिलेल्या निवेदनाचे वाचन केले.

जिंतूरच्या २००० महिला सहभागी
जिंतूरच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या होत्या. तालुक्यातील जवळपास हजार महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे, तालुका अध्यक्ष सैनिक बालाजी शिंदे, शहर अध्यक्ष बाळासाहेब काजळे आदींनी याचे नियोजन केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोज आणि वाचा, कसा, होता हा विराट मोर्चा.... किती होती उपस्थिती... मतभेद विसरून सर्वजन एकत्र
बातम्या आणखी आहेत...