आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, मृताची पत्नी अन्य एक जण गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तालुक्यातील खांडवी येथे शेतीच्या वादातून सख्ख्या तीन भावांमध्ये साेमवारी सकाळी जोरदार हाणामारी झाली. या मारामारीत सरकी उपटण्याच्या चिमट्याचा डोक्यात घाव घातल्याने सर्वात माेठ्या भावाचा जागीच मृत्यू झाला, तर मृताची पत्नी अन्य एक जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील खांडवी फाट्यावर घडलेल्या या थरारक घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठी गर्दी जमली हाेती. दरम्यान, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील गढीपासून चार किलाेमीटर अंतरावर असलेल्या खांडवी येथील श्रीकिसन रघुनाथ नाईकवाडे (४५), गंगाभीषण नाईकवाडे (४२), गोपीकिशन नाईकवाडे (४०) हे तीन सख्खे भाऊ असून त्यांची शेती खांडवी फाट्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ लगत आहे. वडिलाेपार्जित शेतीतूनच गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भावांमध्ये वाद धुमसत होता. साेमवारी या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. या वेळी लहान भाऊ गंगाभीषण इतरांनी श्रीकिसन नाईकवाडे यांच्या डोक्यात सरकी उपटण्याच्या चिमट्याने घाव घातले. यामध्ये श्रीकिसन यांचा जागीच मृत्यू झाला, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मृताची पत्नी विमल नाईकवाडे यांनाही जबर मारहाण करण्यात आली. विमलही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात नंतर पुढील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेत गोपीकिशन हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार चाफेकर, पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. गंगाभीषण नाईकवाडे हा घटनास्थळीच होता.