आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना जामीन: कामाचे बिल देण्यासाठी घेतले होते दोन लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शासनाचे कृषी विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे बिल कंत्राटदारास देण्यासाठी चार लाखांच्या रकमेची मागणी करीत दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सोनपेठच्या दोन कृषी अधिकाऱ्यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, मंडळ कृषी अधिकारी तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी आनंद मनोहर कुलकर्णी यांच्या परळी येथील घराची बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने झाडाझडती घेतली. तपासणीत हाती काय लागले, याबाबतचा तपशील समजला नाही.
सोनपेठ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत शासनाच्या योजनेचे काम केल्याबद्दल प्रभारी अधिकारी आनंद कुलकर्णी व कृषी पर्यवेक्षक माधव नारायण चाटे यांनी संबंधित कंत्राटदाराकडे चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावर कंत्राटदाराने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे मंगळवारी तक्रार दिल्यानंतर पथकाने सोनपेठमध्ये रात्री उशिरा या दोघांना कंत्राटदाराकडून दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती प्रत्यक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी सोनपेठ पोलिसांत रात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल झाला होता. या दोघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मंजूर केला.
बातम्या आणखी आहेत...