आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विक्रेत्यांच्या काेर्ससाठी सरकार सकारात्मक, तालुका, जिल्हा कृषी संघटना नाेंदणीसाठी लागल्या कामाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - कृषी विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारने डिग्री अाणि डिप्लोमाची अट घातली हाेती. त्यामुळे देशातील सुमारे सहा लाखांहून अधिक कृषी विक्रेत्यांपुढे पेच निर्माण झाला हाेता. दरम्यान, जुन्या कृषी विक्रेत्यांना तीन महिन्यांच्या काेर्सच्या अनुषंगाने केंद्राने सकारात्मक भूमिका घेतली असून दाेन आठवड्यांच्या अात संबंधित विक्रेत्यांनी त्यांची नावे कृषी भवनकडे सादर करण्याबाबत सूचित केल्याने जुन्या कृषी विक्रेत्यांना दिलासा मिळाला अाहे.   
 
जुन्या कृषी विक्रेत्यांच्या या प्रश्नावर   नवी दिल्ली अॅग्राे इनपुट असोसिएशनचे शिष्टमंडळ अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे कृषी सचिव पटनायक यांना भेटले हाेते. जुन्या विक्रेत्यांसाठी डिग्री व डिप्लोमाची अट रद्द करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली हाेती.
 
यावर दाेन अाठवड्यांत भारतातील सर्व जुन्या कृषी विक्रेत्यांची यादी कृषी भवन नवी दिल्ली येथे दाखल करण्याचे अादेश त्यांनी दिले.  या शिष्टमंडळात माफदाचे अध्यक्ष प्रकाश कवडे, सत्यनारायण कासट, अॅग्राे इनपुटचे खजिनदार अाबासाहेब भाेकरे, तसेच मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगण, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित हाेते.   
 
जुने विक्रेते, त्यांचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, फर्मचे नाव, ई-मेल अायडी १ मार्चपर्यंत तालुका, जिल्हा असोसिएशनकडे सादर करतील. त्यानंतर तालुका, जिल्हा असोसिएशन राज्य असोसिएशन माफदाकडे सादर करतील व राज्य असोसिएशन नॅशनल असोसिएशनला देतील. सर्व विक्रेत्यांनी त्वरित तालुका असोसिएशनशी संपर्क साधून अापली नावनोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष कलंत्री यांनी केले.  
 
या यादीत ज्या विक्रेत्यांची नावे असतील त्यांनाच तीन महिन्यांच्या कोर्ससाठी ग्राह्य धरण्यात येणार अाहे. तसेच या काेर्सनंतर अनुभवाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायण कासट यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...