आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत एप्रिलपासून विमानसेवा सुरू!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - शिर्डी विमानतळाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी संबंधित ठेकेदारांना मार्चअखेर काम पूर्ण करण्याची डेडलाइन दिली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विमानसेवा सुरू होईल. मुंबईसह दिल्ली, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अशा फेऱ्या सुरू होतील, असे विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी सांगितले.  

पत्रकारांना माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, शिर्डी विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष आग्रह असून, ते याचा सातत्याने आढावा घेत असतात. सध्या विमानतळावरील मनोऱ्यांची कामे, टर्मिनल्सचे बांधकाम, पार्किंग आदी कामे प्रगतिपथावर आहेत.
बातम्या आणखी आहेत...