आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या, ग्रामीण भागात अवैध धंदे तेजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची बदली होताच ग्रामीण भागातील अवैध धंदे तेजीत सुरू झाले आहेत. नवे पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे आल्यानंतर पूर्वीप्रमाणे अवैध धंद्यांना लगाम लागणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सिंधू यांच्या कार्यकाळात गावागावातील अवैध धंदे बंद होते. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू होते त्या पोलिस अधिकार्‍यांची मुख्यालयात बदली केली होती. त्यामुळे पोलिस खात्यात त्यांचा दबदबा होता.

पैठणमध्ये ‘मटका’ सुरू
शहरात 15 दिवसांपासून मटका सुरू झाला आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात मटक्याचे 12 तास बुकिंग केले जात आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी दीक्षित गेडाम जाताच मटका सुरू झाला आहे. तीन महिने बंद असलेल्या मटक्याचे बुकिंग शहरातील शिवाजी चौक ते आंबेडकर चौकदरम्यान करण्यात येत आहे. खुलेपणे खेळल्या जाणार्‍या मुंबई-कल्याण नावाच्या या मटक्याने शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भुरळ घातली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.