आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! अजिंठा लेणीवरही दरड कोसळण्याची शक्यता; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - पुणे येथे माळीण गावावर डोंगर कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. अजिंठ्यातील लेणी परिसरातही मोठा पाऊस झाल्यानंतर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होण्याचा धोका असून सावधानतेचा इशारा म्हणून पुरातत्त्व विभागाने लेणी परिसरात दोरखंड बांधून पर्यायी मार्गाची सोय केली आहे. ज्या भागात दरड किंवा दगड कोसळतात त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जावकरण्यात आला आहे.

अजिंठा लेणी बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे. पावसामुळे लेणीला कुठलाही धोका पोहोचत नाही. मात्र, मोठा पाऊस झाल्यास वरील भागातून दरड कोसळण्याचा धोका असतो. तसा याही वर्षी धोका असून त्याबाबत पुरातत्त्व विभागाने पर्यटकांना सूचना देऊन सजग केले आहे. लेणी पाहताना ज्या भागात दगड कोसळण्याची शक्यता आहे, ते ठिकाण दोरखंड लावून बंद करण्यात आले आहे. ज्या ठिकाणाहून दगड कोसळतात त्यावर पुरातत्त्व विभागाचा अभ्यास सुरू आहे. अजिंठा लेणी बेसाल्ट खडकापासून बनल्याने इतर दगडांपासून धोका नसल्याचे पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

दोनशे वर्षांत भूकंप असो किंवा जोरदार पाऊस, लेणीस कुठलाही धोका पोहोचलेला नाही; परंतु पुरातत्त्व विभागाने वाघुर नदीला तटबंदी केल्यास पाणी येण्यास मज्जाव होईल व दगड पडण्याचे थांबेल. - विजय पगारे, पर्यटक

लेणी परिसरात वरील भागातून दगड-दरडी कोसळतात त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत. सध्या लेणीस कुठलाही धोका नाही. ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत. - डी. एस. दानवे, पुरातत्त्व विभाग, अजिंठा लेणी

(फोटो : दरड कोसळण्याची भीती असल्याने लेणीसमोर सूचना फलक)