आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती शासन हे केवळ घोषणाबाज, अजित पवार यांची सरकारवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राज्यातील युती शासन हे केवळ घोषणाबाज असून दुष्काळाकडे ते पुरेशा गांभीर्याने पाहत नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी अहमदपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ. जे. एम. वाघमारे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार तोंडचिरकर, बाबासाहेब पाटील, बसवराज पाटील नागराळकर यांची उपस्थिती होती. पवार म्हणाले, युती शासनाने दुष्काळावर मात करण्याच्या विविध घोषणा केल्या, परंतु त्या वास्तवात आल्या नाहीत. जाहीर केलेली मदत दुष्काळाग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोहोचली नाही. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे. शेततळ्याचे अनुदान वाढवावे, मनरेगा अंतर्गत प्रतिदिन १९२ रुपये मजुरी देण्यात यावी, गुरांसाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात अशा मागण्या करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ऊस लागवड आणि दुष्काळाचा संबंध नाही, ठिबकवर ऊस घेता येतो, असे त्यांनी सांगितले. राज्य आणि केंद्रात समान सरकार असूनही शेतकऱ्याला त्यांनी उघड्यावर टाकले असल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.

शासनाची भूमिका अयोग्य
राज्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतले नाहीत तर लोक न्यायालयात जातात. न्याय मिळवतात. समन्यायी पाणी वाटपाबाबत शासनाने योग्य भूमिका घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यांत पाण्यावरून वाद निर्माण झाले. शासनाने योग्य निर्णय घेतले असते तर आज लातूरमध्ये रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली नसती, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कंधार येथे पत्रकारांशी बोलताना केली. अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुक्यातील खांबेगाव, सुभाषनगर आदी गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...