आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडे साहेबांच्या नावाला साजेसेच काम झाले पाहिजे : अजित पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - गोपीनाथराव मुंडेंसोबत सावलीप्रमाणे धनंजय मुंडे यांनी साथ दिली. मुंडे साहेबांच्या नावाला साजेसेच काम तेथे झाले पाहिजे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. परळी येथे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारत, नटराज रंगमंदिर, भालचंद्र वाचनालय या विविध विकासकामांच्या उद‌्््घाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.राजेश टोपे, आ.अमरसिंह पंडित आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पवार म्हणाले, गोपीनाथराव मुंडे सोबत सावलीप्रमाणे धनंजय मुंडे यांनी साथ दिली. मुंडे साहेबांच्या नावाला साजेसेच काम तेथे झाले पाहिजे. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे अशांना संधी दिली पाहिजे ही पवार साहेबांची भूमिका आहे. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, भावनेच्या राजकारणाने परळीचा विकास होणार नव्हता. राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे झाली परंतु रुपयाही शहराच्या विकासासाठी आणले नाहीत. मी ज्यांच्या हाताला धरून राजकारणात आलो त्यामुळेच त्यांच्या नावाने कै.गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर उभारले आहे.
बातम्या आणखी आहेत...