आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्याकांड करणार्‍यांकडे सत्ता देणार का - अजित पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - ज्या लोकांनी गुजरातमध्ये हत्याकांड केले, अशा लोकांच्या हातात देश चालवायला देणार का, असा प्रश्न उपस्थित करीत जनतेत जातीय तेढ निर्माण करून भावनिक राजकारण करणार्‍यांचा जनतेनेच आता विचार करण्याची गरज आहे. कारण जातीय तेढ व विद्वेष निर्माण करून रोजीरोटीचा प्रश्न मिटत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले.

परभणीचे उमेदवार विजय भांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्टेडियम मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, बाबाजानी दुर्राणी, सुरेश जेथलिया, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख उपस्थित होते.