Home »Bollywood »Marathi Cinekatta» Akhil Bharatiya Marathi Natya Samelan At Osmanabad On 21 To 23 April

नाट्य महोत्सव: 'लावण्यखणी' कार्यक्रमाने उस्मानाबादकर रसिक झाले मंत्रमुग्ध

विशेष प्रतिनिधी | Apr 20, 2017, 18:02 PM IST

उस्मानाबाद- येथे 21 ते 23 एप्रिलदरम्यान 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रंगणार आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे.

नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 16 एप्रिलपासून नाट्य महोत्सवास प्रारंभ झाला आहे. काल (बुधवारी) रात्री झालेल्या 'लावण्यखणी' या कार्यक्रमाला रसिकांकडून भरभरुन दाद मिळाली. सुजाता कुंभार, चतुर्थी पुणेकर, करिश्मा कोल्हापूरकर, सोनी सोलापूरकर, ज्योति मिरजकर, भाग्यश्री, स्वप्नालीच्या दिलखेचक अदांनी उस्मानाबादकरांना मंत्रमुग्ध केले.

तुळजाभवानी क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या नाट्यमहोत्सवाल नाट्यरसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आधी झालेले 'ऑल दी बेस्ट' नाटक, पौर्णिमा नगरकर यांचा 'नटरंगी नार' तसेच संतोष पवार यांचे 'यंदा कदाचित' हे नाटक, 'दिल कभी भरा नही', 'घायाळ मी माऊली' व दिलीप प्रभावळकर लिखीत 'हसवाफसवी' हे नाटक सादर करण्यात आले होते.

(छायाचित्र सौजन्य: आरीफ शेख)

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... 'लावण्यखणी' सुजाता कुंभार, चतुर्थी पुणेकर, करिश्मा कोल्हापूरकर, सोनी सोलापूरकर, ज्योति मिरजकर, भाग्यश्री, स्वप्नालीच्या दिलखेचक अदा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended