आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड, परभणी, लातूर-
नांदेड, परभणी, लातूरसह मराठवाड्यात ईद-उल- फित्रचा सण उत्साहात शनिवारी साजरा करण्यात आला. दरम्यान, दुष्काळी मराठवाड्यात धो धो पाऊस कोसळू दे अशी प्रार्थना समाजबांधवांनी अल्लाहकडे केली. नांदेडला सकाळी साडेनऊ वाजता ईदगाह मैदानावर विशेष नमाज अदा करण्यात आली. हाफेज खारी मोहंमद सलीम मिल्ली यांनी नमाज पठण केले. मौलाना मोईन खासमी यांनी विश्वशांती, बंधुभाव, शांततेसाठी प्रार्थना केली.
परभणीत हिंदू बांधवांनी मुस्लिम समाजाला ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. लातूर शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता मौलाना मुस्तफा मजाहिरी यांच्या मागे ईद-उल- फित्रची पवित्र नमाज झाली. त्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी यांचे प्रवचन झाले. पाऊस पडावा, अशी प्रार्थना अल्लाहकडे सर्वांनी केली. तसेच जालना, औरंगाबाद, बीड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांतही ईद उल फित्र साजरा करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...