आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा छळ केल्याचा आरोप; डाॅक्टरला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - पत्नीचा हुंड्यासाठी अनन्वित छळ केल्याच्या आरोपावरून परभणी येथील बालरोग तज्ज्ञासह सहा जणांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी डाॅ. रविशंकर नव्हाट यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
शहरातील तरोडा नाका परिसरात राहणाऱ्या डाॅक्टर वैशाली यांचे ६ डिसेंबर २००७ रोजी परभणी येथील डाॅ. रविशंकर नव्हाट यांच्याशी लग्न झाले. त्यांना ७ व ३ वर्षांची दोन मुले आहेत. लग्न झाल्यापासूनच महिलेचे सासरे डाॅ. दशरथ नव्हाट, सासू पार्वती, दीर अनिल, सोमेश्वर, जाऊ प्रतिभा यांची हुंडा कमी मिळाला म्हणून कुरबुर सुरू होती. त्यावरून अनेकदा खटकेही उडाले. एक वर्षापूर्वी डाॅ. रविशंकर यांनी रुग्णालय बांधण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी वैशाली यांना माहेरहून ६० लाख रुपये आणण्यास सांगितले, परंतु एवढी रक्कम माहेरचे लोक देऊ शकणार नाहीत याची जाणीव वैशाली यांनी करून दिल्यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. अनेकदा तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात आले.
या काळात डाॅ. रविशंकर मोबाइलवर त्यांना अश्लील ध्वनिचित्रफीत दाखवून अनैसर्गिक कृत्य करीत होता. त्याचप्रमाणे मुलाचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत होता. तिच्या माहेरच्या लोकांनाही त्यांनी धमक्या दिल्या. कुटुंबाची बदनामी होईल, वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होईल या जाणिवेने आपण याबाबत काही तक्रार केली नाही, असे डाॅ. वैशाली यांनी सांगितले. वैशालीच्या माहेरहून ६० लाख रुपये मिळत नाही, असे पाहून डाॅ. रविशंकर यांनी दिवाळीनंतर त्यांना घरातून हाकलून दिले. त्यानंतर त्या माहेरी वास्तव्याला आल्या. त्यांना हाकलून लावण्यात त्यांच्या घरातील सासू, सासरे, दीर, जाऊ यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

हुंड्यासाठी छळ
आपल्या पतीसोबत परस्त्रीचे अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक माहितीही डाॅ. वैशाली यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना िदली. अखेर शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून डाॅ. वैशाली यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, अनैसर्गिक कृत्य आदी विविध कलमान्वये ६ जणांविरुद्ध रात्री १ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. डाॅ. रविशंकर यांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमृता बोरचाटे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...