आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगाव येथे अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यामुळे खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड - तालुक्यातील किनगाव येथे अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. मृताची ओळख पटू शकली नाही. मात्र खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

किनगाव येथील अंबड-रोहिलागड रोडवर गट नंबर 272 मध्ये दामोदर गंगाराम पिवळ यांच्या शेतासमोरील रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या प-हाटीच्या ढिगावर अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिस पाटील दिलीप रुंजाजी बिन्नीवाले यांच्या माहितीवरून अंबड पोलिसांनी पंचनामा केला. यानंतर अंबड उपजिल्हा रुगणालयात शवविच्छेदन झाले. याप्रकरणी अंबड ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख अलमगीर हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेतील मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील गावांमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. शिवाय पोलिसांचे विशेष पथक तपास करत आहे.