आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबडच्या एसडीएमला तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - वाळूचे ट्रक सोडण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर-पालवे यांना औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता ही कारवाई करण्यात आली.

अंबड येथील एका वाळू वाहतूकदाराच्या टिप्परवर सविता चौधर यांनी कारवाई केली होती. तक्रारदाराने टिप्पर सोडण्याची विनंती केली तेव्हा चौधर यांनी आठ लाख रुपयांची मागणी केली. वाळू वाहतूकदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून अंबड येथील नूतन वसाहत भागात ही कारवाई केली. यावेळी सविता चौधर यांच्या मागणीवरुन खाजगी इसम श्रीराम नागरे याने तक्रारदाराकडून तीन लाख रुपये स्वीकारले. यात पन्नास हजाराच्या नव्या तर अडीच लाखांच्या जुन्या नोटांचा समावेश आहे. दरम्यान, रात्री उशिरा चौधर यांना जालना एसीबी कार्यालयात आणण्यात आले. येथे पुढील कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...