आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाईत मेडिकलच्या 50 जागा वाढल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - वैद्यकीय महाविद्यालयांत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या अटीवर प्रत्येकी पन्नासप्रमाणे राज्यातील दहा शासकीय महाविद्यालयांना एमसीआयने पाचशे जागा वाढवून दिल्या. मात्र, अटींची पूर्तता करण्यात केवळ अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पात्र ठरले. राज्यातील नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची वाढीव जागांची मान्यता रद्द झाली आहे.

केंद्राने टप्प्याटप्प्याने प्रवेश क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. शंभर जागांच्या महाविद्यालयात 50 जागा वाढवल्या होत्या. त्यानुसार राज्यातील दहा महाविद्यालयांत पाचशे जागा वाढल्या होत्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव, होस्टेल सुविधा, शिकवण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक नसणे, सुसज्ज अपघात कक्ष, वाचनालय, इंटरनेट या सर्व बाबींवर त्रुटी काढत एमसीआयने नऊ महाविद्यालयांच्या साडेचारशे वाढीव जागा रद्द केल्या.

काय होत्या अटी व शर्ती
- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व मनुष्यबळ उपलब्ध असावे
- यंत्रसामग्रीत ब्लड बँक, एक्स- रे विभाग, सीटी स्कॅन, सुसज्ज अपघात कक्ष
- सुसज्ज वसतिगृह, मैदान, वाचनालय, इंटरनेट असावे.

त्रुटी पूर्ण करता आल्या
अटींची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे त्रुटी दूर झाल्या. या शैक्षणिक वर्षात वाढीव जागांचा फायदा होईल.’ पृथ्वीराज साठे, आमदार, केज

सर्वांच्या सहकार्याने यश
वाढीव जागांचे र्शेय आमदार पृथ्वीराज साठे, महाविद्यालयातील कर्मचारी वर्गाला जाते. दज्रेदार शिक्षण व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.’ सुधीर देशमुख, अधिष्ठाता, स्वाराती

मान्यता रद्द झालेली महाविद्यालये
- बी. एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज
- राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर
- शंकरराव चव्हाण कॉलेज, नांदेड
- इंदिरा गांधी महाविद्यालय, नागपूर
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
- शासकीय महाविद्यालय, अकोला
- शासकीय महाविद्यालय, यवतमाळ