आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंभोरा पोलिसांची तरुणाला कोठडीत मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - यात्रेत गैरवर्तन केल्यामुळे अटक केलेल्या तरुणाला कोठडीत पोलिसांनी मारहाण केली. मारहाणीचा प्रकार कथन करताच न्यायाधीशांनी तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

लोणी येथील ग्रामदेवतेच्या यात्रेत गैरवर्तन केल्याने अंभोरा पोलिसांनी रघुनाथ मोहन साळे (26) या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीत पोलिसांनी रघुनाथला जबर मारहाण केली. गुरुवारी त्याला कोठडी संपल्यानंतर पुन्हा येथील न्यायालयासमोर हजर केले. रघुनाथने न्यायाधीशांसमोर पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तक्रार केली. त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना आरोपीच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. पुढील वैद्यकीय तपासणी वर्ग 1 दर्जाच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांनी करावयाची असल्याने रघुनाथला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.