आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरिक्त शिक्षकांच्या तंबूत राज्यमंत्र्यांची वर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - ज्यांना चार दिवसांपूर्वी आंदोलन करण्यासाठी जागा दिली जात नव्हती त्या अतिरिक्त शिक्षकांच्या आंदोलनाच्या तंबूत थेट राज्यमंत्र्यांनीच बैठक मारल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांची धावपळ उडाली. तसेच लोकांपासून फटकून राहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमित देशमुख यांच्या मंत्री झाल्यानंतरच्या कार्यपद्धतीमध्ये झालेल्या बदलामुळे उपस्थितही आश्चर्यचकित झाले.

जिल्हा परिषदेत तुकड्यांची मान्यता मिळवून 350 शिक्षकांची भरती करण्यात आली होती. मात्र, त्यांना 18 महिन्यांपासून पगारच दिलेला नाही. चार दिवसांपूर्वी आंदोलन करण्यासाठी आलेल्या या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी गेटवरच अडवून ठेवले होते. तीन तास गेट बंद ठेवावे लागले. त्यानंतर या शिक्षकांना आंदोलनाची परवानगी मिळाली. त्यांचा शनिवारी चौथा दिवस होता. त्यातच दिवंगत नेते विलासरावांच्या पुतळा उभारणीच्या भूमिपूजनासाठी राज्यमंत्री अमित देशमुख शनिवारी जिल्हा परिषदेमध्ये आले होते. त्यांना भेटून शिक्षकांनी कैफियत सांगितली. त्यावर देशमुख थेट आंदोलनकर्त्यांच्या तंबूत गेले.

तेथे सतरंजीवरच त्यांनी बैठक मारून मागण्या ऐकून घेतल्या. चार दिवसांपूर्वी पोलिसांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या गेटवरच अडवणार्‍या अधिकार्‍यांची मग धांदल उडाली.