आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात्यावरील रक्कम गेली कोठे; दोन आठवड्यांनंतरही बँकेकडे नाही उत्तर, एटीएम कार्डची गोपनीयता भंग?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- वॉलेटच्या सहाय्याने बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यातील रक्कम परस्परच उडवण्याचा प्रकार घडल्यानंतर ही रक्कम नेमकी कोणत्या खाते क्रमांक अथवा मोबाइल क्रमांकावर ट्रान्सफर झाली, याची माहिती बँकेकडून दोन आठवड्यानंतरही मिळालेली नाही. यामुळे बँकेतील खात्याच्या सुरक्षेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या बँकेत एटीएम कार्डवरी माहिती लिहिन्याच्या नावाखाली लिफाफा फोडला जात आहे. 

आॅनलाइन चोरी करणाऱ्या भामट्यांनी बँक ग्राहकांच्या खात्यावर डल्ला मारण्यासाठी नवीन फंडा शोधून काढला आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यावरील रक्कम थेट वॉलेटमध्ये परस्पर जमा होण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन आठवड्यापूर्वी एका ग्राहकाच्या खात्यावरील २४ हजार ९९८ रुपये आयडीया मनी एमपैसा या वॉलेटवर जमा झाले. यावर कडी म्हणजे अशा ऑनलाइन दरोड्यासंदर्भात बँकेची बेफिकीरी समोर आली आहे. शहरातील शिवाजी चौक येथील बीओआयच्या खात्या संदर्भात असा प्रकार घडला आहे. 

गंडा बसलेल्या ग्राहक सोजर हरिश्चंद्र कोळी (रा. राजूरी, ता. उस्मानाबाद) यांनी आपली रक्कम नेमकी कोणाच्या खात्यावर वर्ग झाली आहे, यासंदर्भात माहिती मिळण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी यासंदर्भात अर्ज दाखल करूनही अद्याप बँकेने काहीही उत्तर दिलेले नाही. उत्तरच्या प्रतीक्षेत असलेले ग्राहक सातत्याने बँकेत फेऱ्या मारत आहेत. मात्र, बँकेच्या शाखाव्यवस्थापकांकडून शून्य प्रतिसाद मिळत आहे. माहिती मागवण्यासाठी मेल केला आहे, माहिती मिळताच आपल्याला कळवण्यात येईल, असे सांगून बोळवण केली जात आहे. 

इतका विलंब कशासाठी 
वास्तविकपहाता आपल्या खात्यातील रक्कम कोठे वर्ग करण्यात आली, याची माहिती घेण्याचा खातेदाराला पूर्ण हक्क आहे. मात्र, माहिती सांगण्यासाठी करण्यात येणारा विलंब संशयाचे धुके अधिक गडद करत आहे. बँकेच्या तंत्रज्ञान विभागाकडे अगोदर माहिती मागवली. नंतर वरिष्ठांकडे माहिती मागवल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. इतक्या कालावधीनंतर संबंधित भामटा याबाबत आपली ओळख लपवण्यास यशस्वी होऊ शकतो. 

पोलिसांकडूनही प्रतिसाद नाही...
कोळी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातही तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडूनही यासंदर्भात काही प्रतिसाद मिळालेला नाही. दोन आठवड्यानंतरही पोलिसांनी कोळी यांना संपर्क साधलेला नाही, यामुळेही आश्चर्य व्यक्त होत असून ग्राहकांचा बँकेतील अर्थव्यवहार धोक्यात आला आहे. 

माहिती आली नाही 
वरिष्ठांकडेखात्यातूनरक्कम कोठे गेली, याची माहिती मागवण्यासाठी इमेल केला आहे. मात्र, अद्यापही माहिती आलेली नाही. माहिती मिळाल्यावर ग्राहकाला कळवण्यात येईल. बँकेकडे रेकॉर्ड ठेवण्यासाठी लिफाफा फोडून त्यावरील नंबर लिहून घेतला जातो. 
- सुखविंदरसिंह, शाखाव्यवस्थापक, बीओआय. 

बीओआयच्या शिवाजी चौक शाखेमध्ये एटीएम कार्डची गोपनीयता भंग होत असल्याचा प्रकार घडत आहे. सील बंद लिफाफ्यामध्ये कार्ड देणे आवश्यक आहे. मात्र, लिफाफा फोडून कार्डवरील माहिती लिहून घेऊन कार्ड दिले जात आहे. रजिस्टरवर ग्राहकांची सही घेऊन कार्ड तसेच हातात दिले जाते. असे होताना कार्डवरील माहिती गोपनीय राहू शकत नाही. 
बातम्या आणखी आहेत...