आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प-1 मध्ये अंगणवाडी भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना डावलून अपात्र उमेदवारांची भरती करण्यात आल्याचा आरोप उपसभापती गौतम शिरसाट यांनी केला आहे. भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, भरती स्थगित करावी, अशी मागणी शिरसाट यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

कनकावतीनगर येथील उमेदवाराचे रहिवासी प्रमाणपत्र चुकीचे व खोटे आहे. तसेच गुण कमी असूनदेखील अधिकचे गुण दाखवून निवड करण्यात आली आहे. नावडी येथील मदतनिसाला प्राथमिक यादीत 49.66 गुण दर्शवून मुलाखतीसाठी बोलावले होते. त्या मदतनिसाला अंतिम यादीत 66 गुण देण्यात आले आहेत. सीता नाईक तांडा, बोरसर बु., गुदमा, जैतापूर येथेही अशाच तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.