आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना - तरुणांनी आजच्या परिस्थितीचे भान ठेवून राष्ट्रसेवेतच परमार्थ साधावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.अंबड तालुक्यातील जामखेड येथील जांबुवंत गडावर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा सोहळ्यात गुरुवारी अण्णा हजारे यांचे व्याख्यान झाले. मंचावर रामायणाचार्य रामराव ढोक महाराज, मराठवाडा वारकरी मंडळाचे अध्यक्ष केशव महाराज चावरे, पालकमंत्री राजेश टोपे, आमदार संतोष सांबरे, प्रकाश बोर्डे, बबलू चौधरी, औदुंबर बागडे आदींची उपस्थिती होती.
हजारे म्हणाले, प्रपंचात काहीच उपयोगी येत नाही व परमार्थात काहीच वाया जात नाही. याचे भान तरुणांनी ओळखले पाहिजे. मनुष्य जन्माला येताना रिकामा येतो आणि जातानाही रिकामाच जातो, तरीही माझं माझं म्हणून सूर्य उगवल्यापासून मध्यरात्रीपर्यंत पळापळ करतो. मात्र, जीवनात समाधान शून्यच मिळते. मग पळून लोकांना फसवून संपत्ती जमवण्याचा फायदा काय, याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. तालुक्याला तसेच देशाला मंदिर मानून सेवा करावी, यातच ख-या अर्थाने ईश्वरसेवा दडलेली आहे, असे आवाहनही हजारे यांनी केले. प्रारंभी उपस्थितांनी वंदे मातरम् व भारतमाता की जय घोषणा देऊन अण्णांचे स्वागत केले.
उमेदवारांना आळंदीला ठेवा
देशातील राजकीय शुद्धीकरणासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान चार वर्षे आळंदीला ठेवण्याचा सल्ला हजारे यांनी दिला. उमेदवार आळंदीला राहिले, तर राजकारणातील गुंडगिरी निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.