आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे दुष्काळ संमेलन १७ ला परभणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- राज्यातपडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाची कारणे परिणाम याबद्दलचे चिंतन करण्यासाठी येथील सामाजिक संघटना शेतकरी कष्टकऱ्यांबद्दल लिखाण करणाऱ्या साहित्यिकांनी येत्या १७ तारखेला अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय दुष्काळ साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. वसमत रस्त्यावरील जागृती मंगल कार्यालयात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन नाटककार विचारवंत राजकुमार तांगडे यांच्या हस्ते होईल.
संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड तर समारोपास प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख हे उपस्थित राहतील. १७ तारखेला सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे नेते अमृतराव शिंदे यांच्या हस्ते होईल. उद्घाटनाच्या सत्रात संमेलनाध्यक्ष संजय वरकड, उद््घाटक राजकुमार तांगडे, प्रा. इंद्रजित भालेराव, प्रा. डॉ. केशव देशमुख, खा. संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, देविदास कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सुभाष शिंदे, प्राचार्य सुरेश सदावर्ते, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, डॉ. अनिल कांबळे, नंदकुमार अवचार, प्रा.किरण सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी दोन वाजता "शेतकरी, शेतमजूर, दलित आणि महिला यांच्यावरील दुष्काळाचा खरा मारा रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत काय?' या विषयावरील परिसंवाद प्रा.डॉ.शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये राजन क्षीरसागर, प्रा.डॉ.यशपाल भिंगे, सोपानराव अवचार, मुरळीधर मुळे, माधव तेलंग सहभागी होतील. दुपारी साडेतीन वाजता पत्रकार आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली "दुष्काळाचे खरेखुरे प्रतिबिंब साहित्य आणि प्रसारमाध्यमे यांनी लोकांपर्यंत आणले आहे काय?' या विषयावर परिसंवाद होणार आहे. कवी शिवाजी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात राज्यातील नामवंत कवी सहभाग नोंदवतील. संमेलनाचा समारोप कवी श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर, आमदार संतोष टारफे, आमदार मोहन फड यांची प्रमुख उपस्थिती राहील, अशी माहिती गणपत भिसे, केशव खटिंग, प्रा. विठ्ठल भुसारे, अशोक उफाडे आदींनी दिली.
बातम्या आणखी आहेत...