आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपेगावातून माउलींच्या दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाकळी अंबड - श्रीक्षेत्र अापेगाव येथील माउलींच्या पालखीचे संत ज्ञानेश्वर मंदिरातून गुरुवारी दुपारी ४ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले.  मंदिर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत  विभागीय उपायुक्त विजयकुमार फड यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात अाले.
 
या वेळी तहसीलदार महेश सावंत, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुंबई नगर रचना विभागाचे विश्वनाथ दहे, नगरसेवक तुषार पाटील, निवृत्ती माने, कैलास बरकसे, माजी सभापती अॅड. कांताराव औटे, अण्णासाहेब औटे, रामचंद्र औटे, भाऊसाहेब औटे, नाथवंशज छय्या महाराज गोसावी, विनायक महाराज अष्टेकर, गणेश महाराज तराशे, लहू औटे, नीळकंठ गुरुजी, माउली औटे, अरुण जोशी, सचिन उंडाळे यांच्यासह वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
 
बातम्या आणखी आहेत...