आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोड रोमिओंवर तुटून पडणा-यां एपीआय पुनम महाजन यांनी स्वतःवरच झाडल्या गोळ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला एपीआय पूनम महाजन यांनी आज त्यांच्या निवासस्थानी औंढा नागनाथ येथे सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आपण स्वखूशीने आत्महत्या करीत असल्याने त्यास कुणासही जबाबदार धरू नये असा उल्लेख असलेली त्यांनी लिहीलेली ‘सुसाईड्ल नोट’ पोलिसांना सापडली असून याबाबत औंढा नागनाथ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

मुळच्या कोल्हापूर येथील पूनम महाजन यांचे लग्न झ्राल्यानंतर त्यांचे पती तथा औंढा नागनाथचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्यासोबत पती-पत्नी समायोजन अंतर्गत हिंगोली पोलिस दलात पीएसआय पदावर बदलीवर आल्या होत्या. गेल्या दिड वर्षांपासून गुन्हे शाखा व महिला तक्रार निवारण कक्षात कार्यरत होत्या. तर गेल्या महिन्यातच त्यांची एपीआय पदावर पदोन्नतीही झ्राली होती.

रोडरोमीओंवर तुटून पडणारी अधिकारी

पूनम महाजन यांच्याकडे हिंगोलीत दाखल झाल्यापासून महिला सुरक्षा कक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या सुमारे दिड वर्षाच्या कार्यकाळात दसरा, गणपती महोत्सवासह इतर कार्यक्रमांमध्ये महिला, युवतींची छेड काढणा-या रोडरोमीओंना चांगलाच हिसका दाखविला होता. शहरातील शाळा, महाविद्यालांच्या परिसरात त्या नियमीतपणे राऊंड मारीत असल्याने रोड रोमिओंसाठी त्या कर्दनकाळ ठरल्या होत्या. त्यांचे फेसबूक अकांऊंट त्यांनी महिला आणि मुलींना तक्रारी करण्यासाठी, माहिती देण्यासाठी खुले केले होते. त्यांच्या आकस्मात निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.