आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत विकास: सेंद्रिय शेतीसाठी अॅपद्वारे मिळणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी निवासस्थानात अशा प्रकारे शिवांश सेंद्रीय खत तयार करण्याचे काम सुरु आहे. - Divya Marathi
जिल्हाधिकारी निवासस्थानात अशा प्रकारे शिवांश सेंद्रीय खत तयार करण्याचे काम सुरु आहे.
जालना- सेंद्रिय शेती ही काळाची गरज झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. पिकांसाठी कमी खर्चात अठरा दिवसांत तयार होणारे शिवांश खताचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सुरू आहे. दरम्यान, हे खत तयार करताना, खत झाल्यानंतर शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास तसेच काही संभ्रम निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित माहिती, व्हिडिओ अॅपवर अपलोड केल्यानंतर तत्काळ मार्गदर्शन केले जाणार आहे. 

दिल्ली येथील हंस फाउंडेशन विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत दुष्काळावर काम केले जात आहे. या फाउंडेशनअंतर्गत राज्यभरातील गावागावांमध्ये हे खत वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. 

याशिवाय सेंद्रिय शेती होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. अनेक संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. हंस फाउंडेशनचे संचालक शान भार्गव यांच्या मार्गदर्शनाखाली जनसाथी दुष्काळ निवारण मंचअंतर्गत असलेल्या आठ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. 

सध्या काही गावांमध्ये जनसाथी दुष्काळ निवारणाची कामे सुरू आहेत. परंतु आगामी काळात ही कामे पावसाळ्याच्या तोंडावर कमी होणार आहेत. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यास घरच्या घरीच शिवांश खत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

काय होणार फायदा ? 
स्वयंसेवीसंस्थांमार्फत शेतकऱ्यांना खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, परंतु याचा वापर जास्तीत जास्त वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना काही शंका, अडचणी असल्यास त्याचे तत्काळ निरसन होण्यासाठी हे अॅप्स तयार केले जात आहे. अागामी काही दिवसांत याचा वापर सुरू होणार असल्याचे पुष्कराज तायडे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...