आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Archaeological Department Found New Things In Usmanabad

उत्खननात आढळले सातवाहनकालीन अवशेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर - सांस्कृतिक पुरातन वारसा असलेल्या तेर येथे २८ जानेवारीपासून उत्खननास प्रारंभ झाला आहे. कोट टेकडीवरील उत्खननात सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. बैराग टेकडीवरही वेगवेगळ्या दोन ठिकाणी उत्खनन करण्यात येत आहे. दरम्यान, सोलापूर व पुणे येथील विद्यार्थी संशोधनासाठी तेर येथे दाखल झाले आहेत.

कोट टेकडीवर ५ बाय ५ मीटर आकाराचे १७ ठिकाणी उत्खनन होणार असून त्यापैकी काही ठिकाणी सातवाहनकालीन भिंत आढळून आली आहे. ७ फुटांवर ३६ सेंमी लांब, १९ सेंमी रुंद व ४ सेंमी उंचीच्या आकाराच्या विटांची भिंत आढळून आली. या ठिकाणी हौदासारखा आकार असलेली ही भिंत आहे. या खड्ड्याच्या बाजूचे खोदकाम करण्यात येत असून त्यानंतरच भिंत किती लांब व रुंद आहे, हे समजण्यास मदत होईल. साधारणपणे ६ फूट लांब व ४ फूट रुंद आकाराची भिंत सध्या उत्खननात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुसर्‍या खड्ड्यात लाल रंगाचा रांजण अर्धा फुटलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. स्त्रियांचा अलंकार असलेले मणी, उथळ, भांडी, सातवाहनकालीन नाणी, बांधकामाचे अवशेष आढळून आले आहेत. बैराग टेकडीचे दोन ठिकाणी खोदकाम सुरू आहे.

विटांचा आकार मोठा - सध्या बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या विटांपेक्षा सातवाहन काळात विटांचा आकार खूप मोठा असल्याचे भिंतीवरून दिसून येते. या ठिकाणी दोन विटा आढळून आल्या आहेत. यामध्ये ३६ सेंमी लांब, १९ सेंमी रुंद व ४ सेंमी उंच आणि ३९ सेंमी लांब, २२ सेंमी रुंद व ५ सेंमी उंचीच्या विटांचा समावेश आहे.