आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री अर्धा तास थरार; शस्त्राचा धाक दाखवत दरोडा, चोरट्यांनी लुटले आठ लाख रूपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- छतावरून घरात प्रवेश करीत चाेरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी श्वानाच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र श्वान गावातील गोदावरी नदीपर्यंतच घुटमळले. या घटनेमुळे तीर्थपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे. 

मंगरूळ येथील रवींद्र देशमुख हे पत्नीसह घरात झोपले असताना गुरुवारी मध्यरात्री २.१५ वाजेच्या सुमारास तीन जण घराच्या छतावरून घरात घुसले. आवाजाने देशमुख जागे झाले. मात्र त्याचवेळी दरोडेखोरांनी त्यांच्या पोटाला चाकू लावला त्यांना गप्प बसण्याचे सांगत कपाटातील २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने,चांदीचे दागिने, रोख २५ हजार रुपये इतर साहित्य असा आठ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. 

शस्त्राच्या धाकावर दरोडेखोरांनी जवळपास अर्धा तास देशमुख यांच्या घरात लूट केली. त्यानंतर देशमुख यांनी ग्रामस्थांना जागे करून त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मध्यरात्रीच ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले. याप्रकरणी रवींद्र देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनवणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या वेळी श्वानाने गावातील गोदावरी नदीपर्यंत माग काढला. या घटनेमुळे मंगरूळ ग्रामस्थांसह तीर्थपुरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत चोरी लुटमारीच्या घटना वाढल्या असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. 

देशमुख यांनी सांगितली आपबीती 
६१ वर्षे वयाचे रवींद्र श्रीधर देशमुख त्यांच्या पत्नी प्रमिला हे दोघे घराच्या हॉलमध्ये झोपलेले होते. दरोडेखोरांनी घरात प्रवेश करताच लाइट बंद केले. आवाजामुळे देशमुख त्यांच्या पत्नी दोघेही जागे झाले. त्यावेळी तीनपैकी एकाने रवींद्र देशमुख यांच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाश टाकून त्यांच्या पोटाला चाकू लावला तर हातात काठी असलेला दुसरा एकजण शेजारी उभा होता. लोखंडी रॉड हातात असलेल्या तिसऱ्या दरोडेखोरांनी त्यांना कपाटाची चावी मागितली. देशमुख यांनी चावी देण्यास नकार दिला तेव्हा त्याने लोखंडी रॉडने कपाट फोडले त्यातील साेन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. देशमुख दांपत्य ज्या हॉलमध्ये झोपले होते त्याच हॉलमध्ये कपाट ठेवलेले होते. 

दरोडेखोर पंचविशीतील 
दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. टी शर्ट जीन्स पँट असा पेहराव होता.तोंडावर रुमाल बांधला होता. तिघेही मराठीत बोलत हाेते. लाइट बंद करून देशमुख यांच्या डोळ्यावर बॅटरीचा प्रकाश टाकल्याने त्यांना तिघांचेही अधिक वर्णन सांगता आले नाही. 

घटनेबद्दल संशय 
मंगरुळयेथेच शिवाजी गोिवंदराव राखुंडे यांच्या घरातून चोरट्यांनी ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. राखुंड हे घरात झोपले असताना गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. यात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून रोख रक्कम दागिने ठेवलेली लोखंडी पेटी चोरुन नेली. देशमुख यांच्या घरात दरोडा घालणाऱ्यांनीच हे कृत्य केले असावे असा संशय व्यक्त केला जातो आहे. 

परंतू मुद्देमाल दाखवला कमी 
या घटनेत देशमुख यांचे जवळपास २५ तोळे सोने,चांदी रोख रक्कम असा जवळपास २५ हजार रुपये रोख असा आठ लाखांचा मुद्देमाल पळविण्यात आला आहे. पोलिसांनी मात्र लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद घेतली आहे. दरम्यान पोलिस श्वानपथकाच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल.बी.सोन्ने यांनी दिली.
 
असा केला घरात प्रवेश 
देशमुखयांच्या घराशेजारील घरावरून दरोडेखोर त्यांच्या घराच्या छतावर आले. देशमुख दांपत्य झोपलेल्या हॉलमध्ये आले. मुद्देमाल लुटून नेल्यानंतर समोरचा दरवाजा उघडून पोबारा केला. देशमुख यांचे पाच रूमचे घर असून दरोडा टाकण्यापूर्वी घराची ंपूर्ण माहिती घेतली.
बातम्या आणखी आहेत...