आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्‍यात सलग दुसऱ्या दिवशी अार्मी हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग, नागरिकांमध्‍ये उलट-सूलट चर्चांना ऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- सैन्य दलाच्या दोन हेलिकॉप्टरने परतूर तालुक्यातील पारडगाव येथे इमर्जन्सी लँडींग केले. मंगळवारी सकाळी ९ वाजता हा प्रकार घडला. दहा मिनीटे थांबल्यानंतर हे दोन्ही हेलिकॉप्टर सोबतच उड्डान घेऊन परत गेले. यापुर्वी सोमवारी सकाळीही अंबड तालुक्यातील नागझरी शिवारात सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडींग केले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्याने नागरीकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे.

परतूर शहरावर सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोन हेलिकॉप्टरनी दोन-तीन वेळा घिरट्या घातल्या. त्यानंतर शहरापासून जवळच असलेल्या पारडगाव रेल्वेगेट परिसरातील मोकळ्या जागेवर या दोन्ही हेलिकॉप्टरने सकाळी ९.०५ वाजता लँडींग केले. हा भाग शहरालगतच असल्याने काही वेळातच येथे मोठी गर्दी झाली. दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये प्रत्येकी तीन जवान होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी नागरीकांनी या जवानांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी उपस्थितांशी बोलणे टाळले. 

दरम्यान दहा मिनिटानंतर या दोन्ही हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतले. नागरीकांनी मोबाईलद्वारे लॅँडींग आणि टेक ऑफचे फोटो, व्हिडीओ घेतले असुन ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. दरम्यान पोलिस आणि महसूल प्रशासनाकडे यांसदर्भात कोणतीही माहिती नाही. सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडींग केले असावे असे पोलिस दलाकडून सांगीतले जात आहे. तर महूसल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हा सैन्याच्या सरावाचा भाग असु शकतो असे सांगितले आहे. मात्र सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्याने नागरीकांमध्ये यासंदर्भात उलट-सूलट चर्चा सुरु आहे.

मदत नको, गर्दी करु नका
सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांचे लँडींग झाले असावे या शंकेतून सोमवारी नागरझरी येथील ग्रामस्थांनी जवानांना काही मदत हवी आहे का? अशी विचारणा केली मात्र जवानांनी मदत नको असे सांगीतले. पारडगाव येथेही काही लोकांनी पुढे जाऊन मदतीसाठी विचारणा केली. मात्र जवानांनी मदत नको येथे गर्दीही करु नको असे सांगतीले.
बातम्या आणखी आहेत...