आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक वाढल्याने दरात घसरण : लातूर बाजारात दिवसाला येतोय तीन टनांवर माल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पावसाने उघाड दिल्याने खरिपातील जवळपास सर्वच पिके वाळून जात असताना लातूरच्या मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी तीन महिन्यांपासून चढ्या असलेल्या भाज्यांच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईत आवक वाढली आहे. दिवसाला तीन ते चार टन भाज्या विक्रीला येत आहेत. यातील सर्वाधिक माल सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून येत असून काही स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे. वाढलेली अावक आणि मागणी कमी झाल्याने गेल्या आठवडाभरापासून भाव घसरू लागले आहेत. मेथी, भेंडी, वांगे, गवार, दोडके, कोथिंबीर, हिरवी मिरची आदी भाज्यांचे दर तर निम्म्यांवर आले आहेत. थोड्याबहूत पाण्यावर अतिशय कसरतीने शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली. त्यातच लातूरसह परिसरातील जिल्ह्यांत जूनच्या पहिल्या आठवड्यात
बऱ्यापैकी पाऊस पडल्याने आणि त्यानंतर कधीमधी हलक्या सरी बरसल्याने भाजीपाला पोसण्यात मदत झाली. त्यामुळे आवक वाढल्याचे व्यापारी सांगू लागले आहेत.
भाज्यांचे ठोक दर (प्रति किलो, रुपयांत)
बटाटे- ८ ते १०, हिरवी मिरची- २० ते २५, सिमला मिरची- २० ते २५, भोपळा- ८ ते १०, टोमॅटो- २० ते २५, वांगे- १५, भेंडी- १५, गवार- १५, दोडके- २०, कारले-४०, मेथी ५ ते ६ रु. पेंडी, कोथिंबीर-२० ते २५, काकडी- २० ते २५, कांदा- १८ ते २२, शेवगा-७० रुपये प्रति किलो.
पाऊस पडल्यास आणखी घट
परजिल्ह्यांतूनही आवक वाढल्याने कांदा, टोमॅटो वगळता उर्वरित सर्व भाज्यांचे दर घसरले आहेत. काही भाज्यांचे भाव ५० टक्क्यांनी कमी झाले असून लवकर पाऊस पडल्यास त्याच्या दरात आणखी घट होईल. श्रीकांत ठोंबरे, भाजीपाल्याचे ठोक व्यापारी, लातूर