आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Beed Local Politics, Divya Marathi ,Maharashtra Assembly Election 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीचे इच्छुक आसुसलेले अन् राष्ट्रवादीचे प्रचारात गुंतले; क्षीरसागर, धस आज अर्ज भरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणूक वीस दिवसांवर आलेली असताना सत्तेची स्वप्न पाहणा-या महायुतीची स्थिती डळमळीत आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यास इच्छुकांचे अवसान गळाले आहे, तर जिल्ह्यावर प्रभुत्व सांगणा-या राष्ट्रवादीकडून केज वगळता कोणत्याच मतदारसंघातून नवा चेहरा पुढे आला नाही. आघाडी, महायुतीचा घोळ कायम असला; तरी जिल्ह्यातील आजी माजी मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे सर्वच आमदार उमेदवारीची पर्वा न करता प्रचार मोहिमा राबवत आहेत.
गुरुवारी उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह इतरांचेही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात कुटुंबातूनच शड्डू ठोकणारे विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे शनिवारी आमदार पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला जनता व नेतेही सामोरे जात आहे. शिवाय मुंडेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकही सोबतच होणार आहे. दसरा दिवाळीत निवडणुकीची रणधुमाळी आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभेच्या तयारीला नेते मंडळी लागली; मात्र आचारसंहितेची प्रतीक्षा करणा-या नेत्यांची महायुती आणि आघाडीची एकवाक्यता होण्याला दिरंगाई होऊ लागल्याने गोची झाली. यातच पितृपंधरवडा असल्याने उमेदवारीचे घोडे अडले. परंतु त्या काळात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांनी आपापल्या मतदारसंघात थांबून मतदार संपर्क मोहिमेसोबतच निवडणुकीची जय्यत तयारी केली. बुधवारी सर्वपित्री अमावस्या संपताच पक्ष नेतृत्वाकडून अधिकृत घोषणांची वाट न पाहता जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २५ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही परिवर्तनाची लाट येण्याची चर्चा सुरू होताच मतदारसंघांमध्ये महायुतीच्या व घटक पक्षांमधील नेत्यांचे कान टवकारले ! बीड विधानसभा मतदारसंघात शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पंधरा ऑगस्टपासूनच मतदारसंघात संपर्क मोहीम सुरू केली. परंतु महायुतीत वातावरण तणावाचे दिसताच ते मुंबईला रवाना झाले आणि प्रचार मोहीम थंडावली. आता शिवसेनेने ही जागा इतरांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप कामाला लागले. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच महायुतीकडून कोण येणार, याचा अंदाज बांधून मतदारसंघावरील आपली पकड अधिक मजबूत करण्याचे काम सुरू केले. नियोजनात हातखंडा असलेल्या क्षीरसागरांनी कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी ताकही फुंकून घेत जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार मोहिमा हाती घेतल्या. लिंबागणेश येथून त्यांनी प्रचाराचा शुभारंभही केला. गेवराई मतदारसंघात आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह पंडित यांनी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी चालवली होती; परंतु जिल्हा परिषदेची लॉटरी लागताच ते आमदार व सख्खे काका बदामराव पंडित यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. बदामरावही या दोन दिवसांतच अर्ज भरणार आहेत. माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे रमेश आडसकर भाजपत दाखल झाल्याने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा मार्ग मोकळा झाला. त्यांनीही २७ सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.

परळीत धनंजय मुंडेंचा रूमाल
लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडे कुटुंबातील सदस्य आल्यास उमेदवार उभा न करण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले असले आणि विधानसभेची जागा आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेली असली; तरी आमदार पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत रूमाल टाकून ठेवला आहे.