आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगले दिवस येणार म्हणून फसवणूक - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड :अच्छे दिन आनेवाले हैं म्हणून सव्वाशे कोटी जनतेला फसविणारे नरेंद्र मोदी यांनी केवळ स्वप्नेच दाखवल्याचे सिद्ध होत आहे. नोटाबंदी, गोवंशहत्या बंदी नंतर आता कॅशलेस इंडिया म्हणणाऱ्या त्यांच्या निर्णयांचा त्रास असल्यामुळे पालिकेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

धर्माबाद नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंडे यांची शनिवारी जाहीर सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आ. बापूसाहेब गोरठेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष विश्वनाथ पाटील बन्नाळीकर आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, नरेंद्र मोदींनी विदेशातील काळा पैसा आणून गरिबांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेतच विरले. त्यांचा प्रत्येक निर्णय गोरगरिबांसाठी त्रासदायकच ठरत असल्याची टीका केली.
बातम्या आणखी आहेत...