आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह 8 जागा एमआयएम लढवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- राज्यातील लोकसभेच्या 8 जागा लढवण्याचा निर्णय एमआयएम पक्षाने घेतला आहे. याबाबत सोमवारी पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

सय्यद मोईन म्हणाले, महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, ठाणे व मालेगाव या जागांवर पक्ष उमेदवार उभे करणार आहे. याबाबत मंगळवारी अंतिम निर्णय होऊन उमेदवार निश्चित होतील अशी अपेक्षा आहे.

12 रोजी एमआयएमतर्फे पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. राज्यात मनसेच्या उमेदवारांचा फटका जसा महायुतीला बसू शकतो, तसाच एमआयएमचा फटका काँग्रेस आघाडीला बसू शकतो. त्यामुळे एमआयएमच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.