आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामबापू सर्मथकांनी धमवकले पत्रकारांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - संत आसारामबापूंच्या सर्मथकांनी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात आसारामबापूंच्या सर्मथकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोधपूर येथे आसारामबापूंविरुद्ध झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी आसारामबापूंच्या सर्मथकांनी दुपारी 1 वाजता महात्मा फुले चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांसह जवळपास 500 कार्यकर्ते सहभागी होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता झालेल्या सभेत आसारामबापूंच्या सर्मथकांनी प्रसारमाध्यमांविरुद्ध आक्षेपार्ह आगपाखड केली. मूर्ख, बेवकूफ, नालायक अशी विशेषणे वापरून पत्रकारांना शिवीगाळ केली. आसारामबापूंविरोधात लिखाण करणार्‍या एका वृत्तपत्राची (दिव्य मराठी नव्हे) सर्मथकांनी होळी केली. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेले पंढरीनाथ बोकारे, विजय निलंगेकर आदी पत्रकार पाहत होते. बापूंच्या सर्मथकांची सभा आटोपल्यानंतर काही पत्रकारांनी या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.


जिवे मारण्याची धमकी
एकेकाला खतम करू, अशी धमकी आसारामबापूंच्या सर्मथकांनी पत्रकारांना दिली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सचिव पंढरीनाथ बोकारे व इतर पत्रकारांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात बापूंच्या सर्मथकांविरोधात तक्रार दाखल केली.