आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chauvan Towords To Delhi But Not Meeting With Highcommand

अशोक चव्हाण समर्थकांना सोनियांनी भेट नाकारली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- आदर्श प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठीशी पक्षाने उभे राहावे, अशी मागणी करण्यासाठी दिल्लीला गेलेल्या त्यांच्या समर्थकांना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी भेट नाकारली.
आमदार अमर राजूरकर, अब्दुल सत्तार, नांदेडचे महापौर अजय बिसेन, नगरसेवक किशोर स्वामी, जि. प. सभापती मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह 150 कार्यकर्त्यांचा जत्था मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाला. त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सोनिया गांधी यांनी त्यांना भेट नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले. काही लोकांनी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले असले, तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार प्रकाश दिल्लीतच नव्हते. त्यामुळे कोणाशीही त्यांची भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर 42 आमदारांंनी अशोक चव्हाणांची बाजू जोरकसपणे मांडली. दिल्लीला गेलेल्यांमध्ये अमर राजूरकर वगळता एकही समर्थक आमदार नव्हता.
कोणालाही बोलावले नव्हते- दिल्लीत सध्या राष्ट्रपती निवडणुकीची लगीनघाई आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची भेट मिळणे शक्य होणार नाही हे लक्षात घेऊन कोणत्याही आमदार, खासदार वा इतर पदाधिका-यांना मी दिल्लीत बोलावले नव्हते. बुधवारी कोण गेले होते हेही मला माहीत नाही. एकही आमदार दिल्लीत नाही. त्यामुळे भेटच मागितली नाही तेव्हा पक्षश्रेष्ठींनी ती नाकारण्याचा प्रश्नच नाही.’- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री असुरक्षित तर आमची काय कथा? ४२ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घेरले!