आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan First Should Prove His Innocentness In Case Of Adarsh Scam Tawade

‘आदर्श’चे निर्दोषत्व सिद्ध करा,विनोद तावडेंचे अशोक चव्हाणांना आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - आदर्श प्रकरणामुळे राजकारण संपवण्याचे आणि स्वपक्षीय नेते अडचणीत आणत आहेत, असे वाटत असेल तर अशोक चव्हाण यांनी ती नावे जाहीर करून पुरावे द्यावेत व निर्दोषत्व सिद्ध करावे, असे आव्हान भाजप नेते विनोद तावडे यांनी गुरुवारी दिले.विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आदर्श प्रकरणात आम्ही अशोक चव्हाणांना मुद्दाम टार्गेट करीत नाही. आपल्या पदाचा लाभ घेऊन नातेवाइकांना फ्लॅट मिळवून देणारे ते एकमात्र नेते आहेत.
या प्रकरणात काँग्रेसच्या इतर माजी मुख्यमंत्र्यांचा व विद्यमान राष्ट्रवादीचे मंत्री सुनील तटकरे व राजेश टोपे यांचाही सहभाग आहे. त्यांच्यावरही आम्ही टीका करतो, परंतु या प्रकरणाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन व्यक्तिसापेक्ष नसून राज्यातील भ्रष्टाचाराचा एक मोठा मुद्दा आहे. या प्रकरणात घडणा-या सर्व घडामोडी या राहुल गांधींच्या इशा-यावर घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यमान मंत्री सावंत यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, त्यांचेही रेणुका गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे सर्व पुरावे समोर ठेऊ, असेही ते म्हणाले.