आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी फेकू; अशोक चव्हाण यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - हजसाठी नागपूर व औरंगाबाद येथून विमानसेवा आहे. नांदेड येथूनही हजसाठी विमानसेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी फेकू आहेत. आपले नाते विश्वासाचे आहे. भारतीय जनता पार्टीने षड्यंत्र रचून पाच मुस्लिम उमेदवारांना काँग्रेसची मते खाण्यासाठी उभे केले, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

देगलूर नाका परिसरातील अब्दुल हमीद फंक्शन हॉलमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मौलाना मोईन खासमी होते. याप्रसंगी माजी मंत्री अनिस अहमद, महापौर अब्दुल सत्तार प्रामुख्याने उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, काही अतिरेकी कारवायांत निरपराध तरुणांना अडकवण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. यापुढे हा अन्याय होऊ नये यासाठी जातीने लक्ष घालण्यात येईल. मुस्लिम बांधवांचा विश्वास तुटू देणार नाही, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी या वेळी दिली.

अनिस अहमद म्हणाले, माझ्यासारख्या मुस्लिम तरुणाला चव्हाणांनी कॅबिनेट मंत्री केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात चव्हाणांच्या काळात कब्रस्तानाला प्रत्येकी 10 लाखांचा निधी दिला. प्रत्येक उर्दू शाळेला 2 लाख रुपयांचे अनुदान दिले. मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 200 कोटींचे अनुदान दिले.