आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श प्रतिज्ञापत्र : अशोक चव्हाणांचे राजधानीसह औरंगाबादेत बंगले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नांदेड लोकसभेची उमेदवारी ‘आदर्श’ प्रकरणामुळे देशभरात चर्चेचा विषय ठरली. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचा तपशील गुरुवारी जाहीर झाला. चव्हाण यांच्या कुटुंबाची एकत्रित मालमत्ता 39 कोटी रुपयांच्या घरात आहे. नांदेड, पैठण, औरंगाबाद, मुंबई, दिल्ली येथे चव्हाणांचे बंगले व फ्लॅट आहेत. तथापि, स्वत:च्या नावे एकही चारचाकी वाहन नाही.

पत्नी अमिता चव्हाण यांच्याजवळ ह्युंदाईची आय-20 (एमएच 22 एन 9990) व महिंद्रा कंपनीची (एमएच 26 एएफ 0900) अशा दोन गाड्या आहेत. अशोकरावांकडे एकूण 592.44 ग्रॅम सोन्याचे, तर सौ. चव्हाणांकडे 1955.94 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. याशिवाय सौ. चव्हाण यांच्याकडे 140.95 कॅरेट हिर्‍यांचे दागिने आहेत. ज्यांची किंमत 64 लाख 55 हजार 510 रुपये आहे. महिंद्रा, ह्युंदाई, बजाज अशा नामवंत कंपनीच्या एजन्सीज आणि भारत गॅस एजन्सीही कुटुंबाकडे आहे. अशोकरावांकडे रोख व इतर मिळून 2 कोटी 92 लाख 46 हजार 453, तर सौ. चव्हाणांकडे 4 कोटी 19 लाख 18 हजार 868 रुपयांची चल संपत्ती आहे. अशोकरावांकडे 14 कोटी 24 लाख 49 हजार रुपयांची, तर सौ. चव्हाणांकडे 8 कोटी 24 लाख 61 हजार 439 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एकत्रित कुटुंबातही त्यांनी 3 कोटी 8 लाखांची मालमत्ता उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवली आहे.

चार खटले प्रलंबित
0सीबीआय विशेष न्यायालयात आदर्श प्रकरण.
0यवतमाळ येथील न्यायालयात जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे बांधकाम नियमित करण्यासंदर्भात आदेश दिल्याच्या आरोपावरून खटला.
0आदर्शप्रकरणी ईडी विभागामार्फत खटला.
0निवडणूक आयोगामार्फत पेड न्यूजसंदर्भात खटला.