आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी इलाज नाही, पण सध्याची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. शासन दुष्काळाबाबत फारसे गंभीर नाही. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.

पत्रकारांशी बातचीत करताना खासदार चव्हाण म्हणाले, यूपीए सरकारने कर्जमाफी केली. हा कायमस्वरूपी इलाज नाही. ती वारंवार केलीच पाहिजे, असेही मला वाटत नाही. तथापि, सध्याची परिस्थिती पाहता ती करणे गरजेचे आहे. ती होणार नसेल तर शेतकर्‍यांना व्याजमाफी करून त्याच्या कर्जाचे पुनर्गठन करावे. नापिकी व कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मराठवाड्यात दोन महिन्यांत १६० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ३३ नांदेड जिल्ह्यातील आहेत. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्यानंतर कर्जाची रक्कम त्याच्या मुलांना फेडावी लागते.

आत्महत्या करणार्‍यांना शासन एक लाख रुपये देते, परंतु कर्जमाफ करीत नाही. किमान आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबाकडून कर्जाची वसुली करू, नये असेही त्यांनी सांगितले. मुदखेड-परभणी मार्गाच्या दुहेरीकरणाला निधी देऊन हे काम तातडीने पूर्ण करावे. यामुळे या मार्गावर अजून १५,२० नवीन गाड्या सुरू करता येतील. ८ तारखेला खासदारांची नांदेड येथे रेल्वेच्या महाव्यवस्थापकासोबत बैठक आहे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेनंतर आता पक्ष संघटनेत लवकरच मोठे बदल केले जातील. त्यासंबंधीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील. नव्या पालकमंत्र्यांना विकासकामात आमचे सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.